औरंगाबाद – बहुप्रतिक्षीत स्मार्ट सिटीबस येत्या २३ डिसेंबरपासून औरंगाबादच्या रस्त्यांवर धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात या बसचे लोकार्पण होणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.
काय आहे बसचे वैशिष्ट्य
महापौर नंदकुमार घोडेले यांनी शहरवासीयांना
स्मार्ट सिटीबसचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन, आश्वासनच राहाते की काय याची चिंता स्वतः महापौरांना सतावत होती. मात्र
शुक्रवारी बसेसे औरंगाबादेत दाखल झाल्या आणि स्मार्ट सिटीबस योजना
प्रत्यक्षात येण्याची सर्व मार्ग मोकळे झाले. २३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी
बसचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
१०० बस औरंगाबादच्या रस्त्यांवर धावणार
चार टप्प्यांमध्ये औरंगाबादसाठी १०० बस येणार
आहेत. प्रत्येक टप्प्यात २५ बस येणार आहेत. जवळपास ३६ कोटी रुपयांच्या
बस खरेदीचा टाटा कंपनीसोबत करार झाला असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.
अल्पदरात
प्रवास आणि मोफत वायफाय
१) या
बसमध्ये ५७ प्रवासी बसु शकतील एवढी आसनव्यवस्था असणार आहे.
२)
प्रवाशांना अत्यंत अल्पदरात प्रवास करता यावा म्हणून प्रवास भाडे खाजगी
वाहनांपेक्षा कमी असणार.
३)
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार.
४)
प्रवाशांना बसमध्ये मोफत वायफाय सुविधा दिली जाणार आहे.
५)
बसचे दरवाजे हायड्रोलिक असणार आहेत.
६)
सीसीटीव्ही कॅमेरे हे वायफाने कनेक्ट असणार आहेत. सर्व चित्रिकरण हे वायफाय मार्फत
स्टोअर केले जाणार आहे.
७)
ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, अपंग यांना खास सवलतींचा लाभ मिळणार आहे.
८)
बसच्या सर्व बाजूंनी सुरक्षेच्या दृष्टीने जाळी बसवण्यात येणार आहे.












